चाळीसगाव येथील सकल धनगर समाजा तर्फे सरकारला रास्ता रोकोचा इशारा
धनगर समाज S.Tआरक्षणाची अंमलबजावी त्वरित करावी या मुख्य मागणी साठी दिनाक 17/12/2023रविवार सकाळी 10 वाजता पु.अहिल्यादेवी होळकर चौफुली बिलाखेड बायपास येथे रास्ता रोको करण्याचे नियोजन आखले आहे गेली 75 वर्ष झाले धनगर समाजाला प्रत्येक पक्ष फकत् आश्वासन देतात ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे आमची धनगर समाजाची अवहेलना कुठेतरी थांबावी त्याकरिता आम्ही आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचे म्हणणे त्यांच्या पर्यंत पोहचन्यासाठी व आम्हास न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको करण्याचे नियोजन आखले आहे
धनगर समाज हा अत्यंत शांत्तताप्रिय. भोळा.व आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब आहे धनगर समाज सर्वांवर लवकर विश्वास ठेवतो महाराष्ट्रात दीड कोटी समाज असून आजही आपल्या घटनेत दिलेल्या हककांपासून वंचित आहे सरकारने आता आमचा जास्त अंत न पहाता लवकरात लवकर महाराष्ट्रातील धनगर समाजाला नव्याने नाहीतर आम्ही आधीच ST प्रवर्गात आहोत आपणास फकत ड. चा र एवढीच सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करायची आहे धनगर हिच जात महाराष्ट्रात अस्तित्वात आहे धनगड ही जात अस्तित्वात नाहीच तसे अनेक पुरावे संविधानात आहे व आमच्या धनगर समाजाच्या अनेक तज्ञांनी .संस्थांनी पक्षांनी थोर नेत्यांनी समाजसेवकानी अभ्यासकांनी सरकारी अधिकारी यांनीही पुरावे शासनास व कोर्टात सादर केले आहे आमची एकच मागणी आहे की आपण आमच्या मागणीचा त्वरित विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावाअन्यथा यापुढील आंदोलने तीव्र स्वरूपाचे असतील ती वेळ शासनाने आमच्यावर आणू नये धनगर समाज हा शांत.संयमी समाज आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात व महाराष्ट्रातील धनगर समाजास ST आरक्षणाची अंमलबजावणी करून एक सुखद धक्का द्यावा व योग्य ते सहकार्य करावे चाळीसगाव तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव यांना विंनती की ठीक वेळेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव विभागाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा समन्वयक संदीप देवरे करत आहे