Breaking News
recent

५२ वर्षीय विकृत व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

 


वर्धा, गीरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात संतापजनक घटना उजेडात आली आहे.या गावातील बावण वर्षीय  आरोपीची सातव्या वर्गात शिकणाऱ्या  मुलीवर नजर गेली.त्याने एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार सुरू केले होते.

त्यात ती पीडिता पाच महिन्यांची गर्भवती झाली.ही बाब कुटुंबाच्या लक्षात आली. त्यांनी गिरड ठाण्यात तक्रार केली.ठाणेदार सुनील दहिभाते यांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी भेट देत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Powered by Blogger.