आदिवासी कोळी महादेव जमातीच्या निवेदनावर कोणत्याही प्रकारचा न्याय न मिळाल्याने आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषन
बुलढाणा
बेरार प्रांतातील अमरावती महसुल विभागामधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.तसेच अमरावती विभागातील बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी हे विमुक्त जाती अ VJ-A मध्ये येतात तरी पण नाम सदृष्याचा फायदा घेऊन त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविलेले आहे.
ते अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्य करुन जप्त करण्यात यावे. सदर मागणी करीता (एल्गार अन्नत्याग आमरण उपोषणांस सुरुवात केली.यामध्ये गणेश इंगळे,गजानन धाडे,संदीप जनार्दन सपकाळ उपोषणाला बसले असून बुलढाणा जिल्ह्यातील समाज बांधव, महिला भगिनी पाठींबा देत उपस्थित होत्या.