Breaking News
recent

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी उस्मान भाई शेख यांची निवड !



श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-

श्रीरामपूर येवला तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी माजी उपसरपंच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उस्मान कादरभाई शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली

उस्मान भाई शेख गेल्या वीस वर्षापासून दैनिक बहिष्कृत भारत व राजनीति समाचार वृत्तपत्र व वेब चॅनलचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टपणे काम करीत आहेत तसेच पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी धडाडीची कामगिरी केली असून अन्याय पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असल्याने त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची या पदावर नियुक्ती करून त्याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केले आहे

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, उपाध्यक्ष बी के सौदागर, असलम बिनसाद, इम्रान शेख, अकबर भाई शेख, राजेंद्र सूर्यवंशी, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मुदसिर पटेल, अफजल खान पठाण, हनीफ भाई तांबोळी, राज मोहम्मद के शेख, राज मोहम्मद आर शेख, सुभाषराव गायकवाड, अकील सुन्ना भाई, संदीप पवार, सुखदेव बाबा केदारे, बाबाजी पवार, सूर्यकांत गोसावी, प्रकाश शेठ मालवकर, विजय खरात, रवींद्र जगताप, मन्सूर भाई शेख, राहुल कोळगे, माधवराव सोळशे, कालिदास अनावडे, वहाब खान पठाण, मन्सूर भाई पठाण, खलील भाई शेख, शाहिद कुरेशी, असलम भाई शेख, शौकत भाई पठाण, सौ बानोबी शेख, सौ सविता भालेराव, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


Powered by Blogger.