Breaking News
recent

श्रद्धेय आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचा जन्मदिन विनम्र आवाहन



 नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील 

 सर्व श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ता तथा प्रेमी बंधू जन, श्रद्धेय आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचा जन्मदिन अर्थात संस्कार दिन आपण दरवर्षी उत्साहात साजरा करीत असतो याप्रसंगी अनेक कार्यकर्ते व गुरुजींवर प्रेम करणारे मान्यवर,हार फुले प्रसाद व विविध भेटवस्तू आणत असतात. परंतु यावर्षी  श्रद्धेय गुरुजींच्या सूचनेनुसार आम्ही आपणास नम्र आवाहन करीत आहोत की, यावर्षी कुठल्याही प्रकारचे हार फुले व भेटवस्तू न आणता आपणास भेट द्यायचीच असेल तर सामाजिक अध्यात्मिक व शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरणारे पुस्तके आपण आणू शकता जेणेकरून ती पुस्तके विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने कामात येतील व गुरुजींना सुद्धा आपल्या या कृतीने प्रसन्नता लाभेल .तरी कृपया नोंद घ्यावी हि विनंती.

विनीत 
 श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा
 राष्ट्रधर्म युवा मंच नांदुरा

Powered by Blogger.