Breaking News
recent

जळगाव जामोद मतदारसंघातील रामभक्त शेगाव येथून अयोध्येला रवाना


शेकडो राम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या शेगाव ते अयोध्या धाम या 'अयोध्या आस्था रेल'ला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात हिरवा सिग्नल देऊन शुभारंभ केला. यावेळी जय श्री रामच्या घोषणांनी शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील वातावरण राममय झाले होते.सुमारे 500 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि हजारो बलिदानानंतर अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर आहेत. संत गजानन महाराजांची पावन भूमी असलेल्या शेगाव येथून अयोध्येपर्यंत 'आस्था स्पेशल ट्रेन' असल्याने रामभक्तांना सुरक्षित प्रवास आणि उत्तम सुविधेसह दर्शनाची संधी मिळणार आहे.

यावेळी प्रत्येक रामभक्ताशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या, रेल्वे प्रशासनाने राम भक्तांना कुठेही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेऊन अतिशय कौतुकास्पद नियोजन केले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. जिल्ह्यातून आणि विशेषतः आपल्या शेगाव नगरीतून या पहिल्या ट्रेनने अयोध्येला जाणारे रामभक्त अत्यंत भाग्यशाली आहेत. 'रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे' ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल  मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार !!!

Powered by Blogger.