श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
स्थानिक सतिफैल भागातील धार्मिक. आध्यात्मिक. सामाजिक कार्यात सदा अग्रेसर रहाणारे श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आज दिं १९-२-२०२४ सोमवार रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलिप झापर्डे.अरूण कडवकर,लालाजी सांगळे. गंगाधर पवार, पार्वतीबाई सुकाळे,जयाबाई सुकाळे. जयश्री ताई झापर्डे.सुशिलाबाई आवलकर. शकुंतला बाई ढवळे. मंगला बाई बावस्कर. संगीताबाई वाघोळे. व मंडळाचे सर्व सदस्य हजर होते मंडळाचे वतीने मागिल २४ वर्षा पासून अखंड पणे धार्मिक. आध्यात्मिक. सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे सुरू आहेत अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे