Breaking News
recent

श्रीरामपूर शहरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे



 श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )-

श्रीरामपूर शहरात महिलांचे गंठण चोरी व अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांवर त्वरित कारवाई करावी असे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने देण्यात आली याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की 

श्रीरामपूर शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामध्ये गंठण,मोबाईल,मोटर सायकल, पाण्याचे मोटर इत्यादी मा गरड्या वस्तू दिवसाढवळ्या बुरटे चोर चोरत आहे श्रीरामपूर शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या घडत आहे यामध्ये थत्ते ग्राउंड, बस स्टॅन्ड परिसर, गोंधवणी रोड, कॉलेज रोड, बाजार तळ परिसर, नेवासा रोड, बेलापूर रोड व गावामध्ये या ठिकाणी अशा घटना वारंवार घडताना दिसत आहे पोलीस प्रशासनाने अशा भुरट्या चोरांचा वेळेत बंदोबस्त न लावल्याने श्रामपूर शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे कारण की हे भुरटे चोर सुरुवातीला असेच असेच छोटे-मोठे साऱ्या करून त्यांची हिंमत वाढेल व पुढील काळामध्ये रस्ता लूट रॉबऱ्या व मोठे दरोडे खून अशा प्रकारचे मोठे गुन्हे करण्यास मागेपुढे पाहणार नाही गोरगरीब लोक कष्टाने अहोरात्र काम करून पाई पाई जमा करून पैसे जमा करून दागदागिने, मोबाईल हँडसेट, व इतर माघारी वस्तू खरेदी करत असतात परंतु भुरटे चोर एका क्षणात ही चोरी करून निघून जातात त्यामुळे जे गोरगरीब लोकांचे चोरी होते त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात व या वस्तू त्यांनी नवरात्र कष्ट करून किंवा कुठल्यातरी बँकेकडून कर्ज घेऊन विकत घेतलेल्या असतात वेळप्रसंगी या बँकेची कर्ज फेडणे होत नसते.

 अशाच या वस्तू चोरी गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट येते असे दोन-चार उदाहरण आमच्या परिचित लोकांसोबत घडलेले  आहे व हे संबंधित लोक अतिशय कष्टाळू व गरीब असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढलेले आहे अशा गोरगरीब लोकांच्या भावनांशी खेळ करून ज्या माता भगिनींना तळतळायला लावले यांना आर्थिक मानसिक त्रास देणाऱ्या भुरट्या चोरांचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करून यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून अशा भुरट्या चोरांना नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे व आमच्या निवेदनाची दखल घेऊन चोरांवर कारवाई करून संबंधित लोकांच्या मौल्यवान वस्तू येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये परत न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे याप्रसंगी म्हणाली याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री देशमुख व उपनिरीक्षक श्री,साळुंखे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चोरांच्या विरोधात कारवाईचे व व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले म्हणून धरणे आंदोलन मागे घेण्यात आली.

 आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा संघटक डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, विधानसभा अध्यक्ष भास्कर सरोदे, शहराध्यक्ष सतीश कुदळे,अमोल साबणे तालुका संघटक,अरमान शेख तालुका सचिव, तालुका उपाध्यक्ष अभिजीत खैरे,श्री.बाळासाहेब ढाकणे,गिरीश पाटोळे विठल ठोंबरे, सुनील करपे,निलेश सोनवणे शहर संघटक, शहर सचिव प्रतिक सोनवणे,महेश सोनी, शहर सरचिटणीस दर्शन शर्मा,नितीन जाधव,संदीप विशंभर शहर चिटणीस,शहर उपाध्यक्ष,सचिन म्होपरे,दीपक सोनवणे, लालजीत यादव, डॉक्टर प्रवीण पहरे,राजू जगताप, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जराड,मारुती शिंदे,चेतन दिवटे ,ज्ञानेश्वर काळे,संतोष औटी,नितीन खरे, रोहित भोसले,फिरोज सय्यद, सुमित चौधरी,ताया शिंदे,अक्षय काळे, सुरेश शिंदे, रमजान शेख,राहुल शिंदे,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Powered by Blogger.