६ देशी पिस्टल जप्त, १ अटकेत शस्त्र माफियांचा टुनकी परिसराचा वावर
महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमारेषेवर सातपुड्याच्या पायथ्याशी सोनाळा पोलीस स्टेशन आहे. टुनकी परिसरात एमपीतील शस्त्र माफियांचा वापर बिनबोभाट सुरुच आहे. याला लगाम बसण्या ऐवजी शस्त्र माफीयांचा खुलेआम वावर बाढला आहे.
सोनाळा पोलीसांनी एका युवकाला ६देशी पिस्टलसह रंगेहात पकडले आहे. यामुळे पुन्हा एकदा सातपुडा हादरला आहे. परिसरात यामुळे एकच खळबळ माजली आहे. या कार्यवाही बाबत पोलीसांनी मोठी गोपनीयता ठेवत प्रसार माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. तर याबाबत दुजोरा मात्र दिला आहे. ही जॉबाज कार्यवाही शुक्रवार २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७ बाजे दरम्यान केदार नदीच्या पुलावर टूनकी येथे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास सोनाळा पोस्टे चे प्रभारी ठाणेदार सपोनि चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. कॉल पण स्विकारले नाही. तर जिल्हा पोलीस अधिक्षक हे या बाबत माहिती देणार असल्याचे सोनाळा पोलीसांचे म्हणणे आहे. दरम्यान एक आरोपी अटक करण्यात आला आहे. तो पायदळ येत असतांना गुप्त माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.
बहुतांश वेळाआरोपी हे एमपीतून येवून शांतप्रिय भाग असलेल्या त्या दुनकी परिसराला बदनाम करित अवैध शस्त्र तस्कारी करित आहेत. यामुळे परिसरातील नागरिक सतत दहशती खाली आहेत. सोनाळा पोलीस स्टेशन हे आंतरराज्य सिमेवर असतांना सीग्रेड पोलीस स्टेशन आहे. येथे पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे. बहुतांश वेळा होमगार्ड येथे मोठ्या संख्येने सेवा देतात. तर पाहिजे त्याप्रमाणात स्थानिक कमी संख्याबळ व गुप्त खबर मिळत नसल्याने पोलीस सतर्क नसतात. दूनकी परिसरात अवैध शस्त्र माफीयांचा वावर वाढला असतांना येथे २४ तास पोलीसांची निगरानी हवी आहे