महिलांच्या स्वावलंबनासाठी मोरया फाउंडेशनने पुढाकार घ्यावा- शालिनीताई विखे
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-
श्रीरामपूर स्पर्धेच्या युगात महिलांनी स्वावलंबी होणे गरजेचे असून मोरया फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेविका स्नेहल केतन खोरेंनी श्रीरामपूरच्या महिला विकासाचे धोरण हाती घ्यावे असा सल्ला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी मोरया फाउंडेशन आयोजित हळदी-कुंकू समारंभात दिला.दरवर्षी रथयप्तमीच्या मुहुर्तावर होणा-या मोरया फाउंडेशनच्या ८ व्या हळदी-कुंकू समारंभात महिलांशी संवाद साधताना सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहेत. महिलांनी बाजारपेठेचे ज्ञान आत्मसात करणे, सध्याच्या स्पर्धेत टिकणे आवश्यक आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांतून हजारो महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे काम सुरू आहे. महिलांच्या व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना नवीन व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन शिबीरे घेणे, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्तीचे धडे देण्यासाठी स्नेहल खोरेंनी पुढाकार घ्यावा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन सौ.विखे पाटील यांनी केले. माजी नगरसेविका स्नेहल खोरे म्हणाल्या की, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांमध्ये आपला प्रभाग अव्वल स्थानी आहे. गेल्या ८ वर्षांपासून श्रीरामपूर महोत्सव, दांडीया नाईटस्, हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र यंदाचा हळदी-कुंकू समारंभ सौ.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आम्हा महिलांना दिशा देणारा ठरला आहे. आपण पुढील काळात महिलांच्या विकासाचे धोरण राबविणार असल्याचे खोरेंनी सांगितले.
यावेळी ॲंकर प्रविण जमदाडे यांनी महिलांसाठी घेतलेल्या स्पर्धांमध्ये शालिनीताई विखेंसह शेकडो महिलांनी सहभाग घेतला. तर फत्तूभाई सय्यद यांनी जुन्या-नवीन गाण्यांची मैफील सजवली. हळदी-कुंकू समारंभाचे प्रभावती लगड, श्रीमती शिला खोरे, अनिता पाटील, सिमा पटारे, मनिषा बर्डे, तृप्ती भगत, अनिता गोरे, सविता घोडेकर, रेखा होते, नुतन माळवे, खुशबू कासलीवाल, राधा चव्हाण, मनिषा रोडे, रेणुका आढाव, वर्षा भोईर, कुणाल दहिटे, समिक्षा भगत, साक्षी बर्डे, शौर्यजा खोरे आदींनी उत्कृष्ट नियोजन केले.