मोटारसायकल चोरणारा आरोपी संतोष तायडे यास नांदुरा पोलीसांनी केली अटक

नांदुरा : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्राम निमगाव येथील रहीवासी सुनील रमेश इवरकर यांचे मालकीची दुचाकी मोटरसायकल चोरी जाण्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली होती.
याबाबत पो. स्टे. नांदुरा येथे गुन्हा दाखल करुन सदरचा तपास निमगाँव बिट जमादार गजानन इंगले, शाम आघाव, संजय वराडे हे करीत होते. त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी आरोपी संतोष विष्णु तायड़े बेलूरा (खुर्द) ता. पातुर जि. अकोला यास अटक करुन चोरी केलेली मोसा MH 28BU 8223 किंमत 45.000. रूपये हीं जप्त करुन आरोपीची सखोल विचारपुस केली असता त्याने अजुन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असता पुढीर कार्यवाही ठाणेदार विलास पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस गजानन इंगले, शाम आघाव हे करित आहेत.