जवळा येथील शाळा ही सर्वात जुनी इमारत विद्यार्थी चे जीव धोक्यात
नांदुरा तालुक्यातील सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जवळा बाजार येथील असुन आज हया शाळेला भेट दिली असता सदर शाळेची इमारत ही फार जुनी झालेली आहे हया भागतील लोकप्रतिनिधी व शिक्षण विभाग प्रमुख व अधिकारी वर्ग यांचे उदासीन धोरण अवलंबिले त्या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी चे जीव धोक्यात आले परंतु हया कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सदर ईमारत केव्हा पडेल याचा भरवसा नाही त्या मुळे जागरूक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे
जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती व उपसभापती व सरपंच अश्या लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ता व ज्येष्ठ पत्रकर सुरेश दादा पेठकर नांदुरा यांनी व्यक्त केले आहे याची दखल न घेतल्यास भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे