संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती महोत्सव.
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
मानोरा तालुक्यातील सावळी येथे गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या ३८५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ९ ते १५ फेबूवारी पर्यन्त श्रीमत भागवत सप्ताह व विविध कार्यकर्माचे आयोजन केले आहे. या सप्ताहाचे भागवत वाचक ह.ब.प.श्री प्रकाश राठोड महाराज (सावळी) यांच्या मधुर वाणीतून होत आहे. दररोज सकाळी प्रभात कळस फेरी ग्रामस्वछता, बंजारा भजन घेतले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते डि डी नाईक यांनी संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती निमित्त श्री पंकज पाल महाराज याचे कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सावळी येथे १४/०२/२०२४ रोजी सायकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार आहे. तरी भाविक भक्तानी येवू कार्यक्रमाची शोभा वाढवावी.