आर पी आय आंबेडकर पक्षाचे उत्तर जिल्हा युवक अध्यक्षपदी प्रकाश ढोकणे
श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
श्रीरामपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची अहमदनगर जिल्हा पदावर कार्यकारणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रकाश ढोकणे यांचं नाव सुचवण्यात आले आहे कारण की त्यांचं काम समाजासाठी सातत्याने झटणारे गोरगरिबांसाठी लढणारे व प्रभाग क्रमांक चार भागांमध्ये कोणत्याही अडचणी कोणत्याही समस्या असल्यास त्वरित ते काम पूर्ण करून घेणारे असे एकमेव नगरसेवक प्रकाश ढोकणे यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट उत्तर नगर युवक जिल्हाध्यक्षपदी श्रीरामपूरचे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा .दीपक निकाळजे ,राष्ट्रीय महासचिव मा. मोहनलाल पाटील, महिला आघाडीचे अध्यक्ष सुनिता चव्हाण ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार ,जिल्हाध्यक्ष मा. भाऊसाहेब पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्याचे पद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रकाश ढोकणे यांना प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉ.राजीव साळवे, रवींद्र हरार ,अमोल पवार ,महमूद शेख ,रामदास ढोकणे आदी भीमसैनिक उपस्थित होते