श्रीरामपूर ते बेलापूरच्या धर्तीवर दत्तनगर ते खंडाळा रस्त्याचे काम करा अशोक लोंढे
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते खंडाळा श्रीरामपूर तालुक्यातील हद्दीत या रस्त्याचे रुंदीकरण करताना श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता रुंदीकरण केले त्याच धर्तीवर हा रस्ता झाला पाहिजे अनेकदा मागणी करूनही संबंधित अधिकारी हे नेहमीच कानाडोळा करत आहेत नुकतीच अहमदनगर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंडळ जिल्हा रस्ते सुरक्षा समिती अहमदनगर आढावा बैठक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्या ठिकाणी दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी जिल्हा अधिकारी यांना दत्तनगर ते खंडाळा या रस्त्याचे गांभीर्य ओळखून लक्ष वेधले सर्व सामान्यांचे अतिक्रमण काढले परंतु अनेक ठिकाणी जैसे थे परिस्थिती आहे कुठल्याही साईड पट्ट्या न भरता रस्ता रुंदीकरण करण्यात कंजूषी दाखवले आहे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी हा रस्ता मुद्दामून 2 वर्षे कालावधीचा काळ उलटून गेला तरी कामं अपुर्ण दिसत आहे
गतिरोधक नाही पांढरे पट्टे नाही दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही अनेक मोठे झाडं तोडून टाकले गावातील अंतर दाखवणारे दगड (माईल स्टोन) अजिबात दिसत नाही चळवळी मागणी केल्याने स्ट्रीट लाईट काम सुरू झाले आहे साई कॉर्नर वाकडी फाटा या ठिकाणी असलेला भला मोठा शिर्डी गणेश नगर वाकडी दिशादर्शक फलक उकडून फेकला तो कधी लावणार दत्तनगर बस स्थानकाची देखील हीच अवस्था असून कुठली परवानगी विना बस स्थानक तोडणे गुन्हा असूनही संबंधित अधिकारी व ठेकेदाराने हे पाप केले आहे दत्तनगर ते खंडाळा या रस्त्यावर अनेक पूल येत असून त्याचे देखील काम अद्यापही सुरू झाले नाही हे सर्व कामे इस्टिमेट प्रमाणे झाली पाहिजे अशी आग्रहाची मागणी दत्तनगर गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर मांडली आहे लगेचच सिध्दाराम सालीमठ जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व कामे वर्क ऑर्डर प्रमाणे झाली पाहिजे
आरोप केलेल्या कामाची चौकशी सुरू केली पाहिजे
उपस्थित जिल्हा पोलिस अधिकारी यांना देखील बुलेट गाडी यांच्या कर्णकर्कश आवाज गाड्यांची सर काढून ते रोलरच्या खाली दाबून टाकावेत त्याशिवाय कमी आवाजाचे बसवण्यात यावे अन्यथा संबंधित वर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी देखील सूचना सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी मांडली त्यावर देखील संबंधित पोलीस अधिकारी यांनी जिल्हाभरात अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे नमूद केले आहे व यापुढे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत
या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य सुरेश शिवलकर अदी उपस्थित होते