ओव्होरा कॉलेजच्या.10 वी च्या विध्यार्थी.विध्यार्थीनींने घेतला मोकळा श्वास
पोलीस संरक्षणात शेवचा पेपर खेळीमेळीच्या वातावरणात पालकांनी केल्या आनंददायी भावना व्यक्त
संगमनेर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
संगमनेर: -ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षा व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे शनिवार दि 23 मार्च 2024 रोजी संगमनेर शहरातील दिगंबर गणेश सराफ विद्यालय.ओहरा कॉलेज संदर्भात संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देत.
संगमनेर शहर व तालुक्यातील हल्लीच्या काळात चाललेल्या राजकीय व सामाजिक दृष्ट्या बघता शहर व तालुक्यात अशांतता निर्माण झालेली असून संगमनेर शहरातील ओहोरा कॉलेज ठिकाणी दि 26/ मार्च 2024 रोजी इयत्ता 10 वी चे शेवटचे ( final )पेपर असल्या कारणाने कॉलेजच्या परिसरात काही टवाळखोर मुले शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत असल्याचे कीत्तेकदा निदर्शनास आलेले आहे अगदी काही दिवसांपूर्वीच ओव्होरा कॉलेजमध्ये काही टवाळखोर हिंदू मुस्लिम युवकांनी जातीय तेढ निर्माण करत विध्यार्थी व विध्यार्थीनींन मधे भितीचे वातावरण निर्माण केले होते.त्या अनुषंगाने संगमनेर पोलीस ठाण्याच्या कार्यश्रेत्रात असलेल्या ओव्होरा कॉलेज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना पेपर देता वेळी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा भिती निर्माण होऊन त्यांचे इयत्ता 10 वी चे शेवटचे उज्वल होत असलेलें भविष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत पेपर चालू होण्यापासून ते पेपर सुटे पर्यंत आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना अभय द्याव सुरक्षा करावी.
अश्या आशयाचे निवेदन त्याच निवेदनाची उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी तत्काळ दखल घेत आज रोजी त्या ठिकाणी एकुण सहा ( 6 ) पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना व पालकांना मोकळा श्वास घेता आला.त्यामुळे ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या महिला पदाधिकारी तसेच पालक व कॉलेज स्टाफ ने संगमनेर शहर पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे तर या पुढील काळात देखील शालेय विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन असेच सहकार्य करतील अशी अपेक्षा ह्युमन इनोवेशन ओर्गनाइझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्षा बनोबी शेख संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव संगमनेर शहर अध्यक्ष आरती सोनवणे अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख रेश्मा शेख आदींनी व्यक्त करत इयत्ता 10 वी च्या सर्व विध्यार्थी विध्यार्थीनी यांना शुभेच्छा दिल्या!