Breaking News
recent

क्रुसाच्या वाटेची भक्ती

श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी 

उपवास काळातील धार्मिक भाग म्हणून क्रुसाची वाटेची भक्ती केली जाते.त्याप्रमाणे श्रीरामपूर येथील लोयोला सदन,लोयोला दिव्यवाणी,संत विन्सेंट चर्च आगाशे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र क्रुसाची वाट सोमवार दिनांक २५/०३/२०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता श्रीरामपूर लोयोला सदन येथून निघाली.नंतर पुढील १४ स्थाने घेतली गेली.त्यामध्ये सुरूवातीची भक्ती लोयोला चर्च श्रीरामपूर,पहिले स्थान पवित्र क्रुस तीर्थ क्षेत्र करूणा माता चर्च वैजापूर,दुसरे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च मनमाड, तिसरे स्थानाची भक्ती करूणा हाॅस्पिटल मनमाड, चौथे स्थान संत झेवियर हायस्कूल मनमाड याठिकाणी, पाचवे स्थान संत विन्सेंट चर्च येवला, सहावे स्थान सेंट मेरी चर्च कोपरगाव येथे, सातवे स्थान सेवानिकेतन चर्च कोपरगाव,आठवे स्थान होली फॅमिली चर्च कोपरगाव येथे, नववे स्थान माऊंट फोर्ड स्कूल सावळी विहीर,दहावे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च राहाता, अकरावे स्थान निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बारावे स्थान बाळ येशू चर्च बाभळेश्वर, तेरावे स्थान सेंट विन्सेंट चर्च (डि पाॅल स्कूल) आगाशे नगर याठिकाणी आणि शेवटचे चौदावे स्थान लोयोला दिव्यवाणी नॉर्दन ब्रॅच श्रीरामपूर याठिकाणी क्रुसाच्या वाटेची भक्तीचा सांगता करण्यात आला.याप्रसंगी श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो गायकवाड,सेंट विन्सेंट चर्चचे रे.फा. थॉमस व फा .संजय ब्राह्मणे  .फा . सयाराज  फा मायकल. ब्रदर जोसेफ.फा. गिल्बट फा.अनिल चक्रनारायण फा. मॅथ्यू तसेच रविंद्र लोंढे व दिपक कदम नितिन जाधव प्रमोद संसारे यांनी उत्कृष्ट पध्दतीने नियोजन केले होते.या धार्मिक क्रुसाच्या वाटेची भक्तीच्या सोहळ्यात जवळजवळ ७०   स्त्री व पुरूषांनी सहभाग घेतला होता.यासाठी सेंट विन्सेंट चर्चचे प्रमुख धर्मगुरू यांनी यासर्व प्रवासासाठी बस दिली होती त्यांचे विशेष आभार  मानले



Powered by Blogger.