राहुरी तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटार पंप व मोटरसायकल चोरी करणारे १० आरोपी राहुरी पोलीस कडून अटक
राहुरी (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-
राहुरी पोलीस ठाणे गुरनं. १३६/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे प्रमाणे अनिल दादा संसारे रा. देवळाली प्रवरा यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दि.९/२/२०२४ रोजी दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत बातमीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विष्लेशन करुन नमुद गुन्हातील मुख्य आरोपी नामे १) संतोय सुरेश गोलवड वय १९ रा. सडे ता राहुरी, २) नवनाथ बाबासाहेब पवार वय २४ रा.सडे महादेव वाडी, ३) सार्थक आण्णासाहेब वांडेकर वय १९ रा. पागीरे वस्ती वांबोरी, ४) अभिजीत भागवत कोळसे वय ३२ रा. आंबी ता राहुरी, ५) मयुर भास्कर उंडे वय ३० रा. देवळाली प्रवरा ता राहुरी, यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी कडे अधिक विचारपुस व चौकशी करीता त्यांनी ९ मोटारी मौजे. सडे, महादेव वाडी, उंबरे व कॅनाल परीसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. नमुद गुन्हयातील चोरी करणारे व चोरीच्या मोटारी घेवून जे स्वत शेतकरी असताना त्या मोटर स्वतः च्या असल्याचे भासवून सदर मोटर अन्य शेतकऱ्यांना विकणारे आरोपी यांना सदर गुन्हयात यापूर्वीअटक करण्यात आली आहे. नमूद गुन्हातील आरोपींकडे पोलीस तपास दरम्यान अधिक विचारपूस करता त्यांनी चार इलेक्ट्रिक मोटरपंम्प काढून दिले आहेत तसेच चार मोटरसायकली ही चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तसेच त्यांचे इतर चार साथीदार यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आली इतर आरोपींची नावे खालील प्रमाणे.
1) संदीप उर्फ गोरख अशोक माळी रासडे ता.राहुरी,2) प्रकाश शंकर वाघ रा पिंपळगाव मालवी ता नगर,3) भरत बाबासाहेब ढोकणे रा.कुक्कडवेढे ता.राहुरी4) आदित्य बाबासाहेब देसले या. कुक्कडवेढे ता राहुरी.5) शुभम उर्फ गोट्या बाबासाहेब चौधरी रा कोक्कडवेढे ता राहुरी यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तपासा दरम्यान त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालील प्रमाणे.
१)५०००/-किमतीची कावेरी कंपनीची तीन हॉर्सपॉर्चची इलेक्ट्रिक मोटार पंप.
२)५०००/-दोन हॉसस्पोरची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार स्टील बॉडी असलेली.
३)१००००/-पाच हॉर्सपॉवरची डेक्कन कंपनीची गंजलेली इलेक्ट्रिक मोटार पंप.
४)५०००/-तीन हॉर्सपॉवरची टेक्समो कंपनीची इलेक्ट्रिक मोटार पंप स्टील बॉडी असलेली.
५)२५०००/- प्लेटिना बजाज कंपनीची मोटरसायकल.
सदर बाबत चौकशी करता श्रीगोंदा पोलीस ठाणे ,संगमनेर पोलीस ठाणे, अमळनेर पाटोदा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री चारूदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक, श्री समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक व सफौ एकनाथ आव्हाड, पोहेको/ विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोना/प्रविण अहिरे, पोकों/प्रमोद ढाकणे, पो कॉ/गोवर्धन कदम पोकों/नदीम शेख, पोकों/ शिरसाठ, पोकॉ सचिन ताजणे,पोका गणेश लिपणे,पोको सम्राट गायकवाड, पोकों/अमोल गायकवाड, मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सथिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोहकों/अशोक शिदे, पोकों/ अजिनाथ पाखरे, पोकों/ रोहकले, चापोहेका/शकुर सय्यद यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुरी लेखनिक पोकों/ सतोष राठोड पो.स्टे. हे करत आहेत.
*राहुरी तालुक्यातील शेतकरी बंधू यांना पोलीस प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात येते की, अनावधानाने आपण जुनी इलेक्ट्रीक मोटार कुणाकडुन विना पावती विकत घेतली असेल तर ती चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल .तसेच पोलीस तपासा दरम्यान आरोपीने जर इलेक्ट्रिक पंप मोटरसायकल दिल्याची माहिती दिल्यास आपणास कारवाई सामोरे जावे लागेल.*
तसेच मोटार चोरी बाबत कुणाला काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशनसंपर्क - 87888 91147, श्री गणेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबा नं.९९२३४१७३४९. पोकॉ. राठोड ९७०२९१९६९६ राहुरी पो.स्टे.
( संजय आर ठेंगे )
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन राहुरी