Breaking News
recent

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

 

मुंबईः गोरेगावमधील एका शाळेमध्ये १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मेघवाडी पोलिसांनी सोमवारी अटक केली.  याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंग व  बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या भीतीने पीडित मुलीने अद्याप तक्रार केली नसल्याचे पोलिसांना सांगितले.

नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेला ३५ वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपीने फेब्रुवारी महिन्यात पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केले होते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली असल्यामुळे तिने तक्रार केली नाही. अखेर तिने धैर्य दाखवून आरोपीविरोधात मेघवाडी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला नवी मुंबईतून अटक केली. याप्रकरणी मेघवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Powered by Blogger.