आदिवासी कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र देण्याचा मागण्यांवर तालुका प्रशासनातर्फे आता पर्यंत कोणतीच भूमिका नसल्याने सरकारला मृत समजून मुंडण करून दशक्रियेचा विधी कार्यक्रम संपन्न
*मलकापूर:-*
दि.१३/८/२०२४ पासुन उपविभागिय अधिकारी कार्यालय मलकापूर समोर आदिवासी कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र देण्यात यावे. ह्या मागणी करीता उपोषणकर्ते ज्ञानेश्र्वर खवले,मनोहर भोलणकर,सूरज तायडे,संदीप सपकाळ यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच असून आदिवासी कोळी महादेव जमातीला भारतीय राज्यघटनेचे कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात असून तरीपण आदिवासी कोळी महादेव जमातीच्या हक्काच्या मागण्यावर अजुनही तालुका प्रशासनातर्फे काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही पाचव्या दिवशी उपोषण मंडपात उपोषणकर्ते मनोहर भोलणकर तर नवव्या दिवशी संदीप सपकाळ, सूरज तायडे यांची तब्बेत बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालय मलकापूर हलविण्यात आले तरी प्रशासनाचे या कडे दुर्लक्षच उपोषणकर्ते यांनी जीवाची परवा न करता लगेच उपोषण मंडपात दाखल झाले.आज उपोषणाचा दहावा दिवस निघाला असून राज्य सरकार व तालुका प्रशासन यांच्या जिवंतपणाचे कोणतेही लक्षण दिसत नसल्यामुळे ह्या सरकारला मृत समजून दशक्रियेचा विधी कार्यक्रम उपोषणाच्या दहाव्या दिवशी आदिवासी कोळी महादेव जमात बुलढाणा जिल्हा जमात बांधवांच्या वतीने करण्यात आला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण मोडणार नाही उपोषणकर्त्यांची ठाम भूमिका आहे.