जागतिक आदिवासी दिन साजरा
(भगवंता चोरे जि.प्रतिनिधी)
दि. ९ ऑगस्ट २०२४ जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा वसाडी(नवी) येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रविभाऊ मांडलेवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हुसेनकाका पालकर , जुम्माभाऊ पालकर (पो.पा), सिकंदरसिंग बाबर,अशोकभाऊ पालकर,मुनिरभाऊ केदार,रामेश्वरभाऊ सागळे हे उपस्थित होते.सर्वप्रथम राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलदार सुरत्ने यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात आदिवासी दिवस साजरा करण्याचे महत्त्व विषद केले
त्याचप्रमाणे आदिवासी समाजाला स्वतःचा विकास करण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे हे पटवून दिले ,त्यानंतर विद्यार्थी भाषणे,आदिवासी नृत्य,आदिवासी गीत असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले ,आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हुसेनजी पालकर यांनी आदिवासी हे जल,जंगल आणि जमिनीचे खरे रक्षक आहेत,आदिवासींनी आपले संस्कृती,भाषा चालीरीती यांचे जतन करायला हवे असे सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक आदिवासी नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.एम.जी.राठोड यांनी तर आभारप्रदर्शन श्री.जमोदकर सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.संदीप सोळंके सर,शिवराम कासदेकर सर,अकबर सुरत्ने सर,आदित्य बोचे सर,सारिका मुटकुळे मॅडम,अंजना जाधव मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले