नगरदेवळा ते होळ फाट्याजवळ मोटरसायकलच्या अपघातात चार जण जखमी
प्रतिनिधी अमीन पिंजारी, कजगावं
कजगाव ता. भडगाव येथुन जवळच असलेल्या जळगाव - चांदवड महामार्गावर नगरदेवळा स्टेशन ते होळ फाट्या दरम्यान आज रोजी झालेल्या मोटरसायकल अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना चाळीसगांवच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज रोजी कजगाव - भडगाव मार्गावरील नगरदेवळा ते होळ फाटा दरम्यान पुढे चालणाऱ्या मोटरसायकल वर मागुन येणाऱ्या मोटरसायकल ने जोरदार धडस दिल्याने दोघं मोटरसायकल स्वार जखमी झालेत. यात नागद येथील दाम्पत्य तसेच पिंप्री येथील दोन तरुण जखमी झाले आहेत. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघात वेळी माजी आमदार दिलीप वाघ हे याच मार्गाने जात असताना त्यांनी आपल्या गाड्या थांबवत तात्काळ रुग्णवाहिका मागवून जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेत टाकत चाळीसगांव कडे रवाना केले. प्रसंगी मोठी गर्दी अपघात स्थळी झाली होती.