Breaking News
recent

संग्रामपूर तालुका भाजपा महिला मोर्चा कार्यकारीणी जाहीर

 


सोनाळा येथून तालुकाध्यक्ष पदी गिताताई लव्हाळे तर चिटणीस पदी वैशालीताई बोदडे 

भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याची महिला मोर्चाची तालुका कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली त्यामधे सोनाळा येथून तालुकाध्यक्ष पदी सेवा निवृत्त शिक्षिका सौ.गिताताई राजूभाऊ लव्हाळे तर सखी सौंदर्य सुधार केंद्राच्या संचालिका सौ.वैशालीताई प्रकाश बोदडे यांची निवड करण्यात आली.भाजपा महिला मोर्चा चा भव्य मेळावा वरवट बकाल येथे २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दुर्गादेवी मंदिर येथे आयोजित केला होता 

यावेळी प्रमुख उपस्थिती मधे विश्व मांगल्य सभा विदर्भा च्या संयोजिका सौ.अपर्णाताई संजयजी कुटे तर भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्षा चंदाताई पुंडे महिला मोर्चा जळगांव जामोद विधानसभा प्रमुख योगिताताई टापरे माजी सभापती नंदाताई हागे आदी प्रमुख मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.सुरुवातीला दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.वरवट बकाल मधून शेकडो महिलांनी यावेळी भा.ज.पा.मधे प्रवेश घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिताताई लव्हाळे यांनी केले तर सूत्र संचालन योगिताताई टापरे आभार प्रदर्शन श्रध्दाताई सुरडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरवट बकाल ग्राम शाखा अध्यक्ष शारदाताई बकाल व त्यांचे टीम ने अथक परिश्रम केले.

Powered by Blogger.