Breaking News
recent

आ. संजय कुटे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडे वाटप

 


भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी

लोकप्रिय, कर्तव्यदक्ष,मा आ. डॉ श्री संजुभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या तालुक्यातील बांधकाम कामगारांना दैनदिन जिवनात उपयोगी पडणारे भांडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मतदार संघातील सर्वात जास्त लाभार्थी आपल्या संग्रामपूर तालुक्यातील होते.आणि एवढ्या मोठ्या म्हणजे जवळपास आठ हजार च्या वर लाभार्थी यांना गैरसोय न होता या किट चा वाटप करणे हे आव्हान संग्रामपुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या समोर होते.

पंरतु नेहमीप्रमाणे आपण या आव्हानाला सामोरे जाऊन आपल्या नेत्याने आपल्या भागातील लोकांसाठी ही योजना ज्या विश्वासाने आणली तितक्याच विश्वासाने आजचा हा कार्यक्रम " न भुतो ना भविष्यवती"यशस्वी केला.आज मोठ्या पासुन ते लहान कार्यकर्ता ज्या मेहनतीने आपल्या दिसेल ते काम करत होते.आपल्या या समर्पण भावनेने मी व्यक्तीशा खुप भावनिक झालो.

कोणत्या मान अपमानाची पर्वा करता सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत त्याच उत्साहाने काम केले.आपल्या सर्वांचे शब्दात आभार व्यक्त करणे कठीण आहे.मी सर्व माझे नेते, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, कार्यकर्ता बंधुचे हृदयाच्या खोलीतून आभार व्यक्त करतो.मी किंवा आपल्या पैकी कोणाच्याही बोलल्याने कोणाचे मन दुखावलं असेल तर मी आपल्या सर्वांची हाथ जोडून माफी मागतो.आपल्या सर्वानी पुन्हा एकदा आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली याच आनंद आहे.भविष्यातही निवडणूक होईपर्यंत आपण याच एकजुटीने,एवढ्याच मेहनतीने मा आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांना पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आणू हा विश्वास आहे.

Powered by Blogger.