कजगाव येथून अज्ञात चोरट्यांनी शेतातून एक गाय एक वासरू चोरून नेले
प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव
कजगाव ता.भडगाव येथील कजगाव कनाशी रस्त्या लगत असलेल्या शेतातील शेड मधुन एक गाय व एक गोऱ्हा तसेच याच मार्गावरील एका शेतातून एक गाय असे तीन पशुधन अज्ञात चोरट्यांनी दि.२८ च्या रात्री चोरून नेल्याने पशुधन मालकात घबराट पसरली आहे
कजगाव कनाशी मार्गावरील कजगाव शिवारातील रस्त्या लगत असलेल्या शैलेंद्र तकतसिंग पाटील यांच्या शेतातील शेड मध्ये बांधलेल्या पशुधनातील एक गाय व एक गोऱ्हा सत्तावीस हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तेथुन पुढे काही अंतरावर असलेल्या पितांबर झिपरू पवार यांच्या शेतात बांधलेली खिल्लारी गाय आठ हजार रुपये किंमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत पोबारा केला एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी कजगाव कनाशी या मुख्य रस्त्यालगत शेतातून पशुधन चोरून नेल्याने पशुधन मालकात घबराट पसरली आहे सदर घटने बाबत भडगाव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ब्रेक के बाद चोऱ्या या ठेवलेल्याच कजगाव हे भडगाव प्रमाणेच महत्वपूर्ण गाव मात्र सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याने गुन्हेगार प्रवृत्ती डोकं वर काढत आहे या ठिकाणी ब्रेक के बाद चोऱ्यांचा सपाटा सुरूच रहातो कजगाव येथे व्यापारी दृष्टीकोनातून मोठी बाजारपेठ आहे शंभर खेड्यांची वर्दळ या ठिकाणी असते त्या दृष्टीने येथे पोलीस मदत केंद्र देण्यात आले आहे या मदत केंद्रावर दिवसा व रात्री साठी कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी तसेच एका फौजदाराची देखील नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे .