लाडक्या बहिणीचे. पैसे पोहोचले भावांच्या खात्यात
सीएससी केंद्र चालकांचा प्रताप, हडपले लाखो रुपये. .
पंडित नरवाडे ग्रामीण प्रतिनिधी हादगाव.
. हदगाव जिल्हा नांदेड . आधार कार्डवर खाडकोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यावर जमा केले त्यानंतर सदर रक्कम सीएससी केंद्र चालकाने हडप केल्याचा प्रकार मराठा (ता. हदगाव) येथे उघडकीस आला आहे लाखोचा घोटाळा करून लाडक्या बहिणी सह त्यांच्या पतीची ही. फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून प्रसार झाला आहे. सचिन सीएससी. सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषाकडून आधार कार्ड. बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केलेत आणि लाडक्या बहिणीचे अर्ज भरताना लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकून. त्यांचा खाते क्रमांकही दिला जेव्हा पैसे जमा झाले. त्यावेळेस रोजगार हमी योजनेतील विहिरीचे पैसे जमा झाले असे सांगून. ओळखीच्या पुरुषाकडून आधार कार्ड, बँक पासबुक, अशी कागदपत्रे जमा केली. लाडक्या बहिणीचे अर्ज भरताना. महिलांचा आधार नंबर टाकण्याऐवजी. पुरुषांचा आधार क्रमांक टाकला. त्यांचा खाते नंबरही दिला, जेव्हा पैसे जमा झाले त्यानंतर रोजगार हमी योजने चे पैसे आल्याचे सांगून, संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली .
(चौकशीचे आदेश ) नेमका काय प्रकार घडला आहे यांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. अशाप्रकारे कोणत्याही योजनेची रक्कम परस्पर उचलणे. हा गुन्हा आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषाची नावे कशी घेतली गेली, यामध्ये कोण कोण सहभागी आहे, हे चौकशीनंतर पुढे येईल जोशीसह संबंधित सीएससीकेंद्र चालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. .
अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड. (असे फुटले बिंग). मनाठा येथील अलीम सलीम कदरी यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्याने या घोटाळ्याचे भिंग फुटले त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली. मराठा गावातील 38 तर बामणी फाटा येथील 33 भावांचा आधार क्रमांक वापरून3 लाख19 हजार500 रुपये परस्पर उचलून सीएससी केंद्र चालक फरार झाला आहे, शासनाला चुना लावला पण बहिणीच्या तोंडाला पाने पुसले आहेत या घोटाळ्याची व्याप्ती. मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या अलीम कदरी यांच्या मोबाईलवर संदेश आला, त्याने लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली तेव्हा कोणाला सांगू नको, काही होत नाही असे सीएससी सेंटर चालकांनी सांगितले. तुमची कागदपत्रे परत करतो. असे सांगून तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सीएससी सेंटरला कुलूप लावून प्रसार झाला