Breaking News
recent

सर्व्हिस रस्त्यात असलेल्या विहीर सदृश वीस ते पंचवीस फूट खड्यात मोटरसायकल गेल्याने तीन जण बालबाल बचावले



 प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव 

कजगाव पारोळा मार्गावरील श्री. चक्रधर स्वामी उड्डाण पुलाच्या बाजूने बनविण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्यात विहीर सदृश वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा असुन सदर चा खड्डा हा पाण्याने फुल भरलेला सदर खड्डा लक्षात न आल्याने दि.१५ च्या रात्री येथील,पंकज सोनवणे, कुलदीप केदार, अजय सोनवणे हे तीन जण मोटरसायकल सह या खड्ड्यात जाऊन पडले सुदैवाने या तिघांना पोहता येत असल्याने तिघ जण वीस ते पंचवीस फूट खड्ड्यातील पाण्यातून बालबाल बचावले तर मोटरसायकल वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात पडल्याने सकाळी जेसीबी च्या सहाय्याने वर काढण्यात आली 

 सदर उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी पुर्ण करण्यात आले मात्र सर्व्हिस रस्त्यात असलेल्या विहीर सदृश खड्डा अद्यापही न बुजल्या मुळे किंवा सदर जागी मार्गदर्शक फलक नसल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली या बाबीची दखल घेत सदर जागेवर दिशादर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.



Powered by Blogger.