Breaking News
recent

तालुक्यातील सोयाबीन पिवळे पडू लागले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल



 मनोज गवई 

ग्रामीण चांदुर रेल्वे प्रतिनिधी 

 चांदुर रेल्वे : सतत पडत असलेल्या पावसामुळे आधीच दुष्काळाच्या छायेत असलेला सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णता सोयाबीन पिवळे पडू लागल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यातील सोयाबीन पिकावर पिवळ्या रोगाचा पादुरभाव झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील सोयाबीन पिके पूर्ण पिवळे पडू लागले आहेत.चांदुर रेल्वे तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा असतो. यावर्षी पावसाचे प्रमाण  जास्त झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पावसामुळे तुरीचे व कपाशो पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यातच यावर्षी अति जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिके पिवळी पडू लागले.शेंगा भरल्या नाहीत, जास्त प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला.सोयाबीन उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, लवकरच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आजी-माजी लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या मोर्चे बांधणी मध्ये व्यस्त असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.

 प्रशासनाने या पिवळ्या पडत असलेल्या सोयाबीन पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव याची झाला याची माहिती शेतकऱ्यांना देणे काळाची गरज आहे.

राजेंद्र बांबल तालुका कृषी अधिकारी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे तालुक्यामध्ये 24 हजार हेक्टर सोयाबीन पिकाची लागवड झाली असून, ज्या भागात चिबळ, व पानपसंद जमीन आहे अस्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून काही ठिकाणीच पिके पिवळे पडायला लागलीआहेत.हर्षलवाघ:शेतकरीचांदूरवाडी,टेंभुर्णी,आमला विश्वेश्वर या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन पिवळे पडू लागल्यामुळे याचा फटका जास्त प्रमाणात दिसून येत आहे यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.

Powered by Blogger.