Breaking News
recent

सोनाळा आश्रमशाळेत वार्षिक स्नेह संमेलन व पालक मेळावा साजरा



भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी


सोनाळा येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाणा द्वारा संचालित असलेल्या प्राथमिक आश्रमशाळेत २८ व २९ जानेवारी रोजी भव्य वार्षिक स्नेह संमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी माता सरस्वती तथा भगवान वीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे व जगन अहऱ्या रेमु डावर या पालक बंधू नी केले.या वेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामधे नृत्य स्पर्धा आदिवासी लोक गीते राष्ट्रभक्ती पर गीत यावर नृत्य सादर करण्यात आली.वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये भगतसिंग,विर तंट्या मामा भिल वीर बिरसा मुंडा या थोर क्रांतिकारकांची वेशभूषा उल्लेखनीय ठरली.वक्तृत्व स्पर्धा झाली यावेळी प्रकाश बोदडे सरांनी वक्तृत्वा विषयी मार्गदर्शन केले.क्रिडास्पर्धे मधे कबड्डी खोखो हॉलीबॉल या स्पर्धा झाल्या या मधे पंकज हळवे सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थी वर्गाला लाभले.पालक मेळाव्याला शेकडोचे संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश चव्हाण तर आभार प्रदर्शन विठ्ठल ठेंग यांनी मानले.कार्यक्रमाला निलेश खोंड,सतीश भातकुले,संजय शिरसाट अधिक्षक संदीप राठोड अधिक्षिका हजारे मॅम उपस्थित होत्या.

Powered by Blogger.