Breaking News
recent

रोटरी क्लब ऑफ गेवराई चा पदग्रहण सोहळा गुरुवारी - - -मान्यवरांची उपस्थिती पार पडला.

 



 प्रतिनिधी  मारोती गाडगे/ गेवराई 

 गेवराई, (बीड:-दि. २५ गेवराई शहरात नव्यानेच स्थापन  झालेल्या रोटरी क्लबला चार्टर प्रदान तसेच   पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण समारंभ गुरुवार दि . २९ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत  गेवराई येथील  न्यू निसर्ग हॉटेलच्या निसर्गरम्य वातावरणात सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे .                          

या समारंभास रोटरी क्लब 3132 चे  डिस्ट्रीक्ट गर्व्हनर डॉ . सुरेश साबू यांच्या हस्ते आणि  डिस्ट्रीक्ट गर्व्हनर २०२५ -२६ रो . सुधीर लातुरे ,पीजीडी रो . हरीष मोटवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक प्रांतपाल रो . गणेश मुळे  , क्लब सल्लागार  रो.राहूल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित  राहणार  आहेत. या कार्यक्रमास सर्व रोटरीयन्स यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष  रो . इंजि नितीन गोपन ,सचिव रो . डॉ . निलेश जगदाळे , रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष रो . प्रा . राजेंद्र बरकसे , सचिव रो . प्रविण जैन, उपाध्यक्ष सुदाम धुपे, सहसचिव डॉ . नागनाथ मोटे, कोषाध्यक्ष सुरेश बरगे ,बोर्ड डायरेक्टर डॉ विजय सिकची, प्रोजेक्ट चेअरमन धर्मराज करपे  यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे .

Powered by Blogger.