दहा हजार भाविकासह श्री.संतराज महाराज पालखीचे झारगडवाडी गावात आगमन...
राहुल चव्हाण @बारामती
झारगडवाडी: दि.२८ रोजी श्री. संतराज महाराज पालखी बारामती,गुणवडी मुक्काम वरुन पंढरपुरच्या दिशेने रवाना होत असताना आज झारगडवाडीच्या वेशीवर मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परीसरात “पहावा विठ्ठल,बोलावा विठ्ठल” अशा वातावरणामध्ये ग्रामस्थ, भंजनी मंडळी व ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.आगमनानंतर पालखी, पादुका, मानाचा अश्व, पूजन करण्यात आले.
या सोहळ्यामध्ये सुमारे १० हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. हे प्रस्थान 58 वे वर्ष साठी पंढरपूर कडे रवाना होत आहे . आगमनानंतर वारकरी मंडळीना झारगडवाडी गावात ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागत कमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले.तसेच विविध ठिकाणी फराळ, पिशवी, खिचडी,केळी, पाणी वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांना पालखीचे दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली आहे.तसेच आज ३वाजता पालखीचे गोल रिंगण झारगडवाडी मध्ये पार पडल्यानंतर मुक्कामासाठी पालखी तावशी या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे.