Breaking News
recent

राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार मध्ये पुणे विभागात इंदापूर पंचायत समिती चा दुसरा क्रमांक



राहुल चव्हाण -बारामती

राज्य पुरस्कृत घरकुल योजना  महाआवास अभियान राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेले होते.त्यामध्ये प्रामुख्याने लवकरात लवकर लाभार्थ्यांकडुन घरकुल पुर्ण करुन घेणे आणि उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक होते.

इंदापूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नांना यश येत पंचायत समिती इंदापूर चा पुणे विभागात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

मा. ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील यांच्या शुभहस्ते पंचायत समिती इंदापूर कार्यक्षम , कर्तव्यदक्ष  गटविकास अधिकारी सचिन खुडे  व  हरिभाऊ बंडगर तसेच पंचायत समिती सर्व सहकारी टीमने पुरस्कारांचा स्विकार केला.



Powered by Blogger.