Breaking News
recent

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती बारामती मध्ये उत्साहात साजरी



राहुल चव्हाण @बारामती

बारामतीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आनंदात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थांचा तसंच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की जगातील सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ, आदर्श स्त्री राज्यकर्त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या अलौकिक लोककार्यातून प्रगत, पुरोगामी सुधारणावादी विचारातून राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा, विचारांचा वारसा राज्यातील महायुतीचं सरकार सक्षमपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं चौंडी जन्मस्थान असलेल्या नगर जिल्ह्याचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यानगर' करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला तसेच बारामतीतील शासकीय रुग्णालयालाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याचं स्मरण करत असताना, त्यांनी त्या काळात दाखवलेली दूरदृष्टी, घेतलेले निर्णय, केलेलं कार्य आजच्या राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे.असे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री.विश्वासराव (नाना) देवकाते पाटील,अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी खासदार सुनेत्राताई पवार, क्रिडामंत्री श्री.दत्तात्रय भरणे,मा.आमदार रुपनवर, गावडे,छ.स.कारखान्याचे चेअरमन जाचक, गावडे तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव,तरुण वर्ग उपस्थित होते.

Powered by Blogger.