स्पेक्ट्रम फाउंडेशन अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हडस्ती व सास्ती गावात वृक्षारोपण,
राहुल दुरतकर, प्रतिनिधी हिंगणघाट (वर्धा)
हिंगणघाट :-स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या पुढाकाराने सास्ती या गावांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ज्यात शेतकरी, महिला बचतगट सदस्य व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या पियू व्यवस्थापक रेणुका फरकाडे प्रक्षेत्र अधिकारी पंकज दोडके राहुल कहुरके वैभव पोहणकर
कार्यक्रमादरम्यान प्लास्टिकमुक्त पर्यावरण या संदेशाचा प्रचार करण्यात आला. सर्व सहभागींस प्लास्टिक वापर टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच योगेश राजूरकर यांच्या शेतामध्ये
यावेळी शेतकऱ्यांना SN9 कल्चर, Trichoderma आणि PSB (फॉस्फेट विद्रावक जिवाणू) यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या जैविक घटकांचा वापर शाश्वत व सेंद्रिय शेतीस चालना देतो तसेच मातीची गुणवत्ता आणि पीक उत्पादनक्षमता सुधारतो.
या उपक्रमामुळे गावांमध्ये पर्यावरणपूरक विचारसरणीला चालना मिळाली असून शाश्वत शेती आणि हरित भविष्यासाठी स्पेक्ट्रम फाउंडेशनकडून उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले.