शिवराज्याभिषेक सोहळा उत्साह साजरा
राहुल दुरतकर, प्रतिनिधी हिंगणघाट (वर्धा)
हिंगणघाट :-श्री. संत नगाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. जेठानंद राजपूत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते . संस्थेचे प्राचार्य श्री. वीरेंद्र पोटदुखे यांना आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रवेश प्रक्रिया व शिकाऊ उमेदवारी योजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते वर्धा येथील श्री. अतुल नंदकिशोर शेंडे. यांनी सामाजिक समरसता या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले तसेच, मा. श्री. पंकज अत्राम (आय. एम. सी.) सदस्य यांनी शिवराज्याभिषेक सोहळा या विषयावर मार्गदर्शन केले. व शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त परिसरात वृक्ष रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन निदेशक सौ. सुवर्णा गडकरी मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन निदेशक सौ. शालिनी चिप्पा मॅडम यांनी केले, या प्रसंगी हिंगणघाट येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. दिनेश मुडे, मा. महाजन (आय. एम. सी.) सदस्य तसेच श्री. त्रिशुलजी लोंढेंकर, विश्व हिंदू परिषदेचे वर्धा जिल्हा सहमंत्री श्री. शरदजी कोणप्रतीवार,विहिपं हिंगणघाट प्रखंड मंत्री श्री. सचिनजी धारकर, श्री. किशोर चवरे उपस्थित होते .या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रणय आठवले याने शिव गर्जना देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली....
कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत संस्थेतील निदेशक श्री. ठाकूर सर, श्री. ठाकरे सर, श्री. फटिंग सर, श्री. वानखेडे सर, श्री. डफ सर, श्री. अजानी, श्री. ससे, श्री. मारबते, श्री. भोयर, तसेच महिला निदेशक सौ. पिट्टलवार मॅडम, सौ. गोहणे मॅडम, सौ. चिमुरकर मॅडम, कु. गुजरकर मॅडम, कु. गायकवाड मॅडम, यानीं सहकार्य केले. या कार्यक्रमाला संस्थेतील विध्यार्थी तसेच शहरातील/गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते .