Breaking News
recent

मातृभूमी सोशल फाउंडेशन व झेप फाउंडेशन पुणे तर्फे गोपाळकुमार कळसकर सन्मानित



 गोपाळकुमार कळसकर @ तालुका प्रतिनिधी 

भुसावळ :  १३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५’ हा  पत्रकार भवन, गांजवे चौक समोर निवारा हॉल (निवारा वृध्दाश्रम) येथे संपन्न झाला. मातृभूमी सोशल फाउंडेशन व  झेप फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थांनी संयुक्तपणे सदर कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खासदार  निलेश  लंके होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुरेखा भणगे मॅडम (सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय) तसेच गोपाल खंडारे सर (स्वराज कॉलेज संस्थापक अध्यक्ष), बन्सीशेठ  पारधी (उद्योजक), राजेश दिवटे (यशवंती आधार सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष), दिग्दर्शक लेखक मा.अल्ताफ शेख, भारतीताई तुपे (संस्थापक अध्यक्ष भारतीय नारी संघटना), मा.प्रा.रूपचंद फुलझेले ,राष्ट्रभक्ती परिवाराचे अध्यक्ष मा.सुनील गोरे, मातृभूमी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील, झेप फाउंडेशन पुणेचे  संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड इ.उपस्थित होते. झेप फाउंडेशन व मातृभूमी सोशल फाउंडेशन ,पुणे यांच्या  संयुक्त  विद्यमाने दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना  महाराष्ट्र रत्न  राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. ‘पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ या तत्वावर  झेप व मातृभूमी फाउंडेशन कार्य करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह  संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने या  संस्था कार्यरत आहे. यावेळी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ व उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन गोपाळकुमार चांगदेव कळसकर (आयुध निर्माणी वरणगांव)  यांना यंदाच्या  महाराष्ट्र  रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता झेप व मातृभूमी सोशल  फाउंडेशनतर्फे सन्मानपत्र, ट्रॉफी, तिरंगा पंचा व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. गोपाळकुमार कळसकर हे दैनिक अधिकारनामा, बाळकडू प्रतिनिधी असून दैनिक  योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा,दर्पण,महाराष्ट्र ग्रामीण न्युज,  तेजोमय न्युज अशा विविध  वृत्तपत्रांतून त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. ते झेप फाउंडेशन, पुणे या संस्थेचे जळगांव जिल्हा सचिव व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे  भुसावळ तालुका सचिव आहेत. या संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर,गरीब विद्यार्थी व गरजूंना  मोफत जीवनावश्यक साहित्य वाटप ,वृक्षारोपण,संविधान परीक्षा आयोजन अशा विविध उपक्रमांचे  त्यांनी उत्स्फूर्त आयोजन व सहभाग नोंदवला आहे. त्यांना आतापर्यंत विविध मान्यवर संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. गोपाळ कळसकर यांचे  सदर पुरस्कार निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन  होत आहे. या कार्यक्रमात स्मिता भंगाळे ,सौ.स्वाती काळे, मनीषा सोनवणे,सौ.अश्विनी आवळे , अशोककुमार मिस्त्री, मिलिंद स्वामी भोसुरे, प्रा.राजु पांचाळ   असे जवळ जवळ ४० मान्यवराना महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मातृभूमी सोशल फाउंडेशन व  झेप फाउंडेशन पुणे यांच्या वतीने अशोक पाटील व कांताभाऊ राठोड यांनी सर्व पुरस्कार्थीना पुढील वाटचाली करिता  शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

Powered by Blogger.