प्रत्येकाने एक रोप लावून संवर्धित करावे - सुरेश शेठ वाधवाणी रोटरी क्लबचा नाविन्यपूर्ण उपक्रम .
प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
दि. ०२ जुलै बुधवार संपूर्ण विश्वात वृक्षतोडीमुळे आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे . उष्णतेचे प्रमाण वाढत आहे . जमिनीला शांत करण्यासाठी आणि निरोगी वातावरण तयार करण्यासाठी चांगला ऑक्सिजन मिळविण्यासाठी वृक्षतोड थांबून नवीन वृक्षांचे रोपण प्रत्येकाने करून त्या रोपाचे संवर्धन आणि जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती सुरेशशेठ वाधवाणी यांनी केले .
गेवराई येथील नगर परिषद कार्यालय व रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रोटरीचे प्रांतपाल रो .सुधीर लातुरे व सहप्रांतपाल रो . कल्याण कुलकर्णी , न . प . प्रशासक विक्रम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरातील नगर परिषदेने विकसित केलेल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम जेष्ठ व्यापारी सुरेशशेठ वाघवाणी, शिवाजीराव वावरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.प्रा.राजेंद्र बरकसे,सचिव रो.प्रवीण जैन , प्रोजेक्ट चेअरमन रो .डॉ. विजय सिकची , पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, वन परिमंडळ अधिकारी देविदास गाडेकर, सुनिल टाकणखार, वनरक्षक आर . एन .सोनकांबळे, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक सनी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरस्वती कॉलनी नंबर १ या ठिकाणी करण्यात आले .
याप्रसंगी विविध वृक्षांची रोपे विविध ठिकाणी लावण्यात आली .ही सर्व रोपं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी रोटरी क्लब गेवराईने स्वीकारली आहे.शहरातील सरस्वती कॉलनी नंबर १ , सरस्वती कॉलनी नंबर २ हनुमान नगर जवळील ओपन स्पेस ,सिद्धिविनायक कॉलनी ,महादेव मंदिर परिसर अशा विविध ठिकाणी सुमारे १०० पेक्षा जास्त वड, पिंपळ, लिंब , चिंच ,बकुळी करन्ज अशा विविध फळा - फुलांच्या सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी रो .डॉ . किशन देशमुख, रो . राधेश्याम येवले, रो . राजेंद्र डेंगे,रो .उत्तम सोलाने,रो . प्रशांत घोटणकर, रो . डॉ . रामदास दातार, रो .डॉ .अभिनव मुळे, रो . सुरेंद्र रुकर, रो . मनोज वाधवाणी, रो . जयराज कौरानी, रो . शरद खरात, अनिलसेठ मंघारामानी ,प्रा. संदिपान हिंगे . सुरेश खरात, ॲड. शिंदे, पर्यावरण मित्र रोहण पंडित ,प्रा. एस. डी. जरांगे, प्रा. अंकुश चव्हाण, सौ. नवलेबाई , कांडेकरबाई , मंडल अधिकारी दत्तात्रय पाटील , अमर वाधवाणी,रोटेरीयन्स आणि नागरिक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते .