Breaking News
recent

आषाढी एकादशी निमित्त सोनगाव जिल्हा परिषद शाळेत पालखी सोहळा



प्रतिनिधी-राहुल चव्हाण @बारामती

जिल्हा परिषद  सोनगाव (ता. बारामती) शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्याचा अनुभव घेतला. गळ्यात टाळ, वीणा, तबला तसेच खांद्यावर पताका डोक्यावर तुळस घेऊन मुखात हरिनामाचा जयघोष करत, अभंग म्हणत गावातून दिंडी सोहळा काढला. विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात फुगड्या खेळण्याचाही आनंद लुटला.  या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्ग, तसेच विद्यार्थी, पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार व्हावेत मूल्य संवर्धन व्हावे यासाठी शिक्षण, शिष्यवृत्ती व क्रिडा, कला क्षेत्रात तालूक्यात आघाडीवर असणारी ही शाळा नेहमीच असे अनेक उपक्रम घेत असते. वारकरी संप्रदायाबद्दल माहिती व्हावी, वारीचा अनुभव घडावा, आपल्या महान संस्कृतीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते. अशी माहीती मुख्याध्यापक यांनी दिली. विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची वेशभूषा करून हा सोहळा आनंदात साजरा केला. गावातील अनेक लोकांनी भक्तीभावाने सहभागी होवून पालखीचे स्वागत केले व विठ्ठलाचे, रूक्माईचे व संतांचे औक्षणही केले.


Powered by Blogger.