शाॅर्टकट पैसे कमाविण्याच्या नादात तरुणाई आँनलाईन गेमिंग कडे आकर्षित
पवन ठाकरे
संग्रामपूर: स्मार्टफोन मुळे आपलं आयुष्य सुकर झालंय हल्ली इंटरनेट आँनलाईनचा जमाना सध्या लहानांपासून ते वयोवृद्धापर्यत मोबाईल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून याच्या अतिरिक्त वापराने तरुणाई बिघडत चालली आहे. अशातच भर पडली ती आँनलाईन गेमची शाॅर्टकट पैसे कमाविण्याच्या नादात अक्षरशः तरुणांचा बळी जातोय हे त्यांच्या लवकर लक्षात देखील येत नाही. काही तरुण मुले पैसे कमाविण्याच्या शाॅर्टकट मार्ग म्हणून मोबाईलवर आँनलाईन गेम खेळतात त्यातून हजारो तरुण यांच्या आकर्षणाचे शिकार बनत असून त्यांना आर्थिक लाभ होण्याचे तर दूरच पण ती मुले घरातील आर्थिक गणिते सुध्दा बिघडवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे त्यांना नैराश्य आर्थिक अडचणी शिक्षणात व कुटूंबाच्या कामात वेळ देता न येणे निद्रानाश आदी अडचणींना सामना करावा लागत आहे
अनेक अँपच्या माध्यमातून अनेक जीवघेण्या आँनलाईन गेम्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. रम्मी सारखे गेम्स सुरुवातीला कुतूहल म्हणून खेळायला सुरू करणारे तरुण हळूहळू त्यांच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत तहानभूक काम सर्व काही विसरून दिवसरात्र पैसे लाऊन आँनलाईन खेळ खेळणे यांतच रममाण झाल्याचे पाहावयास मिळत आहे पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई आँनलाईन गेम्सच्या आहारी जाऊन कर्जबाजारी व्यसनाधीन निद्रानाशाचा तरुणाईला फटका बसत आहे सध्या मोठ्या प्रमाणात आँनलाईन गेम्सच्या माध्यमातून काही तासांतच लाखो रुपये कमवा करोडपती व्हा अशी आमिषे दाखविणारा जाहिरात दिवसभरात सतत पाहायला मिळत आहेत तरुणाई याकडे ओढली जात असून कर्जबाजारी होत असल्याचे कामकाजावरही विपरीत परिणाम झालेला पहायला मिळत आहे काही कर्जबाजारी तर काही यातील नैराश्यामुळे व्यसनाधीन झाले आहेत तर काहीची झोप उडून त्यांना निद्रानाश जडला आहे
आजकालची काही तरूण कष्ट न करता आँनलाईन गेम्सच्या माध्यमातून कसे आपण एका दिवसांतच लखपती बनू या विचारात असतात त्यांतच आता प्रत्येकाला हातात मोबाईल आहे दिवस रात्र मोबाईलच्या सानिध्यात घालणाऱ्यांना आता आँनलाईन गेम्सच्या माध्यमातून गुंतण्यात तरुणाई चे प्रमाण अधिकच आहे. त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत जाणून मोबाईल गेम खेळणे तसेच पैसे हरल्यामुळे झोप उडणे अशा मानसिक नैराश्यातून मद्यपानाकडेही ओढा वाढला आहे एकंदरीतच हे आँनलाईन पैसे मिळवून देण्याचा दावा करणारे गेम तरुणाईसाठी घातक ठरत आहेत हे मात्र नक्की आहे अशा या आँनलाईन गेमच्या घातक खेळापासून तरुणाईला रोखण्यासाठी आई वडील यांनी लक्षच देण गरजेचे आहे.त्यांचे प्रबोधन करुन चांगल्या वाईट गोष्टींची वेळीच त्यांना जाणीव करुन देणे आवश्यक बनले आहे.
