जागृत हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगलवाडी
रिसोड /प्रतिनिधी- दरवर्षी प्रमाणे तालुक्यातील जवळच असलेल्या मंगलवाडी येथे जागृत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो परंतु दोन वर्षे कोरोना मूळे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले नव्हते परंत यावर्षी अतिशय उत्साहात व जल्लोषात सप्ताहाचे आयोजन प्रारंभ 9 एप्रिल ते 16 एप्रिल रोजी शेवट हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला तरी हनुमान जन्मोत्सत्व निमित्त काल्याचे कीर्तन ह भ प रामायनाचार्य बंडूदेव महाराज इटोलीकर परभणी यांचे सकाळी 8 वाजता हरि किर्तन ठेवण्यात आले आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संस्थांचे अध्यक्ष यांनी सांगितले.