Breaking News
recent

वानखेड ग्रामस्थांना पिण्यासाठी होतोय विषारी पाण्याचा वाटप: ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा.स्वाभिमानीची मागणी.



मतिन शेख,संग्रामपुर प्रतिनिधी
 वानखेड गावामध्ये अनेक महिन्यांपासून दूषित पाण्याचा  पुरवठा होत असल्याने नागरिकांना तेच पाणी प्यावे लागत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजना ही जरी कार्यान्वित असली तरी, वानखेड गावाला मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळत नसल्याने गावातील नागरीकांना  बोरवेल चे पाणी १४० गावच्या पाण्यामध्ये मिक्स करून ते दूषित पाणी पूर्ण गावांमध्ये पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला दूषित पाणी प्यावे लागत आहे, परिणामी अनेक नागरिकांच्या जिवाला या दूषित पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता संग्रामपूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त किडनी ग्रस्त रुग्ण असल्यामुळे या ठिकाणी १४० गाव पाणीपुरवठा योजना देण्यात आली परंतु आज पंधरा वर्षे होऊन सुद्धा वानखेड गावाला योग्य त्या प्रमाणामध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत नाही. नियमानुसार प्रति व्यक्तीला ५५ लिटर पाणी देणे आवश्यक आहे. वानखेड गावची लोकसंख्या ही अकरा हजारापेक्षा जास्त असून देखील त्या ठिकाणी फक्त ६० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेलीच टाकी आहे. एवढ्या पाण्यामध्ये वानखेड गावाची तहान भागत नाही. वारंवार लोकप्रतिनिधिच्या कानावरती ही बाब टाकून सुद्धा आज पर्यंत वानखेड वासियांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. करिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ एप्रिल रोजी पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. जर वानखेड गावाचा पाणी प्रश्न निकाली लागला नाही तर मंगळवार १९ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अनंता मानकर यांच्या सह ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी विलास तराळे, गणेश माळोकार, श्रीकृष्ण मोड़कर उपस्थित होते.

Powered by Blogger.