"आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही" - मा. ना. भारतीताई पवार यांची ग्वाही
धाड येथे ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण व आरोग्य मेळावा संपन्नः
बुलडाणा जिल्ह्याच्या आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच भविष्यात जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांनी धाड येथील ऑक्सीजन प्लांटच्या लोकार्पण आणि भव्य मोफत आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
दि. 22 एप्रिल रोजी धाड ता. जि. बुलडाणा येथे तोरणा महिला अर्बन बँक उद्घाटन , डॉक्टर फॉर यू या संस्थेच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सीजंन प्लांटचे लोकार्पण व आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ना. भारतीताई पवार बोलत होत्या.
"आम्ही चिखली येथे गर्भाशयमुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम घेतली असता मोठ्या प्रमाणावर महिलांनी प्रतिसाद दिला. यावरून या सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणासाठी महिला पुढे येत आहेत. त्यामुळे ही लस मोफत उपलब्ध करून द्यावी", अशी मागणी मी या समारोहात केली.
या वेळी आमदार श्वेता ताई महाले पाटील ,माजी आमदार मा. विजयराज शिंदे, डॉक्टर फाॅर यू संस्थेच्या डॉ. वैशाली रेणू, सर्वश्री देविदास पाटील, सुनील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर योगेश राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.
या वेळी डॉ. नितीन तडस जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. एम. एम. राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. डॉ. वैशाली वेणू संचालक डॉक्टर्स फॉर यु, श्रीरंग अण्णा एन्डोले जिल्हा कार्यकारिणी सदस्य, डॉ. सरपाते तालुका आरोग्य अधिकारी, संकेत झा सचिव डॉक्टर्स फॉर यु, ॲड. सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप , दत्ता पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजप , डॉ. तेजराव नरवाडे, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा , सखाराम नारोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य , प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य , प्रकाश पाटील पदोळ जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी , संदीप उगले , जितेंद्र जैन तालुका सरचिटणीस भाजप, किरण सरोदे तालुका कोषाध्यक्ष भाजप , गणेश राव साखरे, सरपंच सौ सत्यभामा बोर्डे , टीका खान , सोहेल खान , अरुण पाटील, पुरुषोत्तम भोंडे , मंगेश जाधव , अनिल जाधव , जयेश पटेल, विष्णू वाघ, संदीप उगले , गजानन जाधव , निलेश धंदर, विशाल मोहिते, विशाल विसपुते, गोपाल तायडे, जितेंद्र तायडे , बबन सुसर ,भगवान पिंपळे, सतीश पाटील, देवेंद्र पायगन , अर्जुन लांडे, शरद देशमुख, समाधान आघाव , कल्याणराव कानडजे , कैलास उबाळे , रमेश ताठे , प्रमोद वाघ, राजू चांदा , गजानन देशमुख, सारंगधर वाघ, समाधान मुरकुटे यांच्यासह आशा सेविका , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.