Breaking News
recent

नझुल शिट सर्वे नं. ४७, सि.स.नं. १८६७ मधील अतिक्रमण हटवा : शंभू गाडेकर



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

     चिखली :- शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील नझुल शिट सर्वे नं. ४७, सि.स.नं. १८६७ मधील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी दि.25 एप्रिल 2022 रोजी मुख्यधिकारी यांच्याकडे  चिखली युवासेना उपशहर  शंभू गाडेकर यांनी एका पत्राद्वारे  केली आहे.

     दिलेला पत्रात नमूद की,चिखली येथील न.प. हद्दीतील नझुल शिट सर्वे नं. ४७. सि.स.नं. १८६७ मधील जागा ही खरेदी घेणार देशमाने यांनी खरेदी देणार नामे  भवर व इतर यांच्याकडून खरेदी केलेली आहे. तेव्हापासुन सदरहू जमिनीचे मालक र देशमाने हेच मालक आहेत. तसेच सदर जागा ही दि. ०१/०३/२०१२ रोजी खरेदीखतान्वये विकत घेतलेली असुन सदर जमिनीवर  देशमाने यांनी वर नमुद १६ बाय ३० अशी जागा असुन या वैतिरिक्त सुध्दा सव्र्हींस लाईन मध्ये ५ फुट व ३० फुट बिल्डींग समोर सुध्दा अतिक्रमण करून तेथे सुध्दा पक्के बांधकाम केलेले आहे.  देशमाने यांनी खरेदी व्यतिरिक्त अतिक्रमण केलेले असुन त्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत. त्यामुळे त्यांचे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे. 

अन्यथा न.प. कार्यालयासमोर युवा सेना चिखलीच्या वतीने तिव्र स्वरूपाचे अंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा युवासेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर यांनी एका पत्राद्वारे दिला आहे.निवेदन देतेवेळी  शैलेश डोनगावकर, पवन चिंचोले, इम्रान भाई, शेख नईम, आयज पटेल, बबलू शेख, जयेश भानुशाली, सोनू बडगुजर यांच्यासह इतर उपस्थित होते.



Powered by Blogger.