७३ प्रकाराच्या झाडांच्या तब्बल १ कोटीपेक्षा जास्त बी जमा करणारा बीजपुत्र
संतोष आमले पनवेल/प्रतिनिधी
लॉकडाऊनमधील रिकाम्या वेळेचा सद्उपयोग करत, तालुक्यातील सारोळा बद्दी गावच्या बीजपुत्र ७३ प्रकाराच्या झाडांच्या तब्बल १ कोटीपेक्षा जास्त बी जमा केल आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्यापूर्वी ज्या- ज्या ठिकाणी या बिया टाकल्या गेल्या त्या-त्या ठिकाणी या बियांना आता अंकुर फूटले आहेत. बीज बॅकेचे ध्येय उराशी बाळगून ते पुर्ण करणारे या तरुणाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिकाम्या वेळेत, प्रवासात विविध झाडांच्या बिया जमा करुन त्या साठवून ठेवायच्या आणि पावसाळ्यापूर्वी डोंगराळ भाग, रस्त्याच्या बाजुने तसेच रिकाम्या जागी त्या टाकाच्या असे ध्येय बाळगणारा हा तरुण आहे अमोल भगवान डाके (रा. सारोळा बद्दी). एक युवाउद्योजक आणि स्नेहल काॅम्प्युटर्सचे मालक म्हणून अमोल डाके सर परिचित आहेत. झाडांच्या बिया जमा करुन झाडें लावण्याचे ध्येय अमोल डाके सर यांनी मागील दहा वर्षापासुन बाळगले आहे. परीसरातील रस्ते डोंगररांगावर वृक्ष तयार झाले आहेत. पाऊस कमी होत असल्याने जनतेचे पाण्यासाठी जास्त हाल होतात, जनतेला आक्सिजन कमी पडू नये यासाठी झाडांची किती गरज आहे हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले.
तेव्हापासून त्यांनी झाडांच्या बिया जमा करण्याचा एक अनोखा छंद जोपासला आहे. आजमितीला अमोल डाके यांच्याकडे विविध झाडांच्या तब्बल एक कोटीहून अधिक बिया जमा झाल्या आहेत. झाडांचे बी जमा करते वेळी एक फोटो न काढता देशासाठी आपल प्रामुख्याने काम करणारे व्यक्तीमत्व, नगर परिसरात पावसाळ्यापूर्वी अनेक झाडांच्या बिया टाकल्यात होत्या त्या आता उगवून आल्या आहेत. नगर शहरातून बाहेर जाणारे सर्व रस्तांच्या बाजुने १० कि. मी. पर्यत विविध झाडांच्या बिया टाकण्यात येणार असल्याचे अमोल डाके यांनी सांगितले. नगर तालुक्यामधील सारोळा बद्दी गावचे बीजपुत्र नगर येथील युवाउद्योजक स्नेहल काॅम्प्युटर्स चे मालक म्हणून ओळखले जाणारे अमोल भगवान डाके कोरोना काळामधी एक दिवस घरी न राहाता, बिया संकलित करणे, स्नेहल काॅम्प्युटर्सचे लॅपटाॅप, प्रिंन्टर, काॅम्प्युटर, टोनर काॅर्टेज रिफिलिंग असे अत्यंत आवश्यक सेवा कामे करणे.