सहकाऱ्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्नात युवकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू ! बहापुरा गावात शोककळा !
मलकापूर : पूर्णा नदीपात्रात रेतीचा उपसा करताना, पोलीस आल्याचे पाहून त्यांच्यापासून वाचण्यासाठी पाच मजुरांनी पूर्णा नदीच्या पात्रात उड्या घेतल्या. त्यापैकी दोघे कसेबसे नदीपात्रातून बाहेर आले, तर इतर दोघांना वाचविणाऱ्या २३ वर्षीय युवकाला जलसमाधी मिळाली. ही घटना (जिगाव) टाकळी वतपाळ शिवारात सोमवारी दुपारी घडली.
मलकापूर तालुक्यातील मौजे बहापुरा येथील रहिवासी रितीक रमेश भालशंकर (२३) हा गावातीलच चार जणांसमवेत (जिगाव) टाकळी वतपाळ शिवारात पूर्णा नदीपात्रात रेती उपसा करण्यासाठी मजूर म्हणून गेला होता. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस आल्याचे पाहून त्यांच्या धाकाने पाचही मजुरांनी पूर्णा नदीपात्रात उड्या घेतल्या. टाकळी वतपाळ शिवारातील त्या ठिकाणी
या घटनेची माहिती कळताच, तालुक्यातील मोजे बहापुरा गावत शोककळा पसरली. तो कुटुंबात एकुलता होता.
पूर्णा नदीपात्राची खोली सुमारे ३२ फूट इतकी असल्याचे सांगितले जाते. काही वेळानंतर दोन जण कसेबसे बाहेर आले. उर्वरित दोघांना रितीक भालशंकर याने जिवाची पर्वा न करता, शर्थीचे प्रयत्न करून वाचविले. मात्र, दोघांना तीरावर आणल्यावर त्यांनी रितीकविषयी चौकशी केली. त्यावेळी तो आढळून आला नाही. हा प्रकार लक्षात येताच जवळच असलेल्या नौका वाहकांनी नदीच्या पात्रात उड्या घेतल्या. रितीकचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. काही कालावधीनंतर त्याचा मृतदेहच आढळून आला. एकंदरीत परिस्थितीत दोन सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्याचाच नदीच्या पात्रात दम लागल्याने मृत्यू झाल्याचा कयास आहे.