मनरेगा कामे मस्टर वरील प्रतिसाद स्वाक्षरी हद्दपार होणार
औरंगाबाद :- प्रथमत बैठकीच्या आयोजनाबद्दल ग्रामसेवक यांच्या आग्रही मागणी बद्दल वेळ दिल्याबद्दल मान्यवरांचे संघटनेच्यावतीने बुके देऊन सन्मान करण्यात आला व खालील प्रमाणे सविस्तर चर्चा घडून आली.मनरेगा साठी स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी या बाबीवर राज्य संघटनेकडून अभ्यासपूर्ण प्रतिपादन करण्यात येऊन ग्रामसेवक कडे मूळ विभागाची आणि मनरेगाची 262 कामे प्रचंड लोड ग्रामसेवक कडे येत आहे.अनेक वर्षापासून ग्रामसेवक यांचा आग्रह आहे स्वतंत्र स्वतंत्र यंत्रणा निर्माण व्हावी केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा परिषदा या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा झालेली आहे.फक्त आणि फक्त गाव पातळीवर याकामी मनरेगाचा स्वतंत्र माणूस स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.ग्राम रोजगार सेवक भक्कम करावा केला सेवाशर्ती लागू कराव्यात असे आग्रही प्रतिपादन केले असता व्यापक मुद्द्यावर चर्चा होऊन 15 मेनंतर मंत्रालयामध्ये राज्य संघटनेने सविस्तर प्रस्ताव द्यावा.याबाबत स्वतंत्रपणे बैठक लावण्याचे मान्य करण्यात आली व तत्वतः हा या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.मनरेगासाठी स्वतंत्र विस्ताराधिकारी तालुकास्तरावर निर्मिती व्हावी या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच विस्ताराधिकारी भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात येईल.असे स्पष्ट आश्वासन यामध्ये देण्यात आलेली आहे आणि सदर पद भरती करताना ग्रामसेवक काम मधून पदोन्नतीने भरण्यात यावे असे आग्रही प्रतिपादन राज्याध्यक्ष यांनी केले.
फळबाग लागवड वृक्ष लागवड या कामावरील ग्रामसेवकांची प्रती स्वाक्षरी काढून टाकण्यात यावी 17 नोव्हेंबर 2021च्या पत्रानुसार शासन निर्णयात रूपांतर व्हावं आणि ग्रामसेवक कडे ही दोन्ही कामं नसावीत.याबाबत आग्रही प्रतिपादन करण्यात आले असता यापुढे ग्रामसेवकांची या कामावर फळबाग प्रति स्वाक्षरी राहणार नाही.अशा प्रकारची स्पष्ट ग्वाही सचिव महोदय यांनी दिली तसेच यापुढे ई-मस्टर सेवा प्रणालीत कार्य प्रणाली विकसित होत असून ग्रामसेवकांची प्रति स्वाक्षरी आवश्यकता भासणार नाही.अशा प्रकारची माहिती विशद केली अतिशय महत्वपूर्ण मागणी मार्गे लागल्याबद्दल संघटनेच्यावतीने समाधान करण्यात येत आहे.
मनरेगा कुशल पेमेंट ग्रामपंचायतीकडे न देणे बाबत या विषयावर संघटनेच्यावतीने 2018 च्या शासन निर्णयाची माहिती देऊन ग्रामसेवक कुशल देयके ग्रामपंचायतीमार्फत वितरित करणार नाहीत.अशा प्रकारची स्पष्ट भूमिका विशद केली यावर सचिव महोदय मंत्री महोदय यांनी केंद्र सरकार राज्य सरकार मिळणारा निधी त्याबाबत ऑनलाईन प्रणालीमध्ये अडचणी विशद करून फक्त 31 मार्चच्या कुशल पेमेंट आपणाकडे वर्ग केलेला आहे.यानंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कुशल देयके ग्रामपंचायतीकडे दिले जाणार नाही.सदर देयके लाभार्थी वेंडर यांच्याकडे दिले जातील असे स्पष्ट प्रतिपादन केले. 31 मार्चला दिले गेलेले वितरीत करण्याबाबत स्वतंत्र पत्र निर्गमित करण्यात येऊन त्यामधील त्रुटी दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मनरेगा ग्रामसेवक संवर्गावर होत असलेल्या अन्याय कारक चौकशी तात्काळ थांबवणे बाबत या विषयावर राज्याध्यक्ष राज्य सरचिटणीस यांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका विशद करून बीड जिल्ह्यातील 550 ग्रामसेवकांवर आकस बुद्धीने जाणीवपूर्वक प्रशासनाच्या धरसोड धोरणाच्या भूमिकेमुळे गंभीर स्वरूपाची कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे.या झालेल्या चुकीच्या कार्यवाही यासाठी बंद केलेल्या वेतनवाढी या तात्काळ मागे घ्याव्यात अन्याय दूर करावा अन्यथा राज्यभर याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे काम करून लोकांवर कार्य या जर होत असतील तर मनरेगाची कामे न केलेली बरी अशा प्रकारचे भावना विशद केली व लक्षवेध करण्याचा खूप प्रयत्न केला आणि यापुढे या बाबत स्वतंत्र प्रणाली विकसित होणे खूप गरजेचे आहे.अशी भक्कम बाजू मांडल्यानंतर मंत्री महोदय सचिव महोदय यांनी 15 मे नंतर बीड जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या बाजू बाबत मंत्रालयात स्वतंत्रपणे संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि भविष्यात मनरेगा साठी यंत्रणा आणि ग्रामपंचायत याकरिता स्वतंत्र चौकशी यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे धोरण निश्चित करण्याची आश्वासन दिले आहे.तसेच मनरेगाची कामे झाल्यानंतर ग्रामसेवकांना चुकीच्या पद्धतीने कार्यवाही होऊ नये.याबाबत उपाययोजना संघटनेने सुचवाव्यात अशी सूचित केले आहे.
गावठाण व गावठाणाबाहेरील कामाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात यावा ग्रामसेवक फक्त गावठाणा अंतर्गत कामे करतील उर्वरित गावठाणाबाहेरील कामे यंत्राने उर्वरित विभाग यांच्याकडे देण्यात यावेत असे प्रतिपादन याठिकाणी विशद करण्यात आली यावर सचिव महोदय यांनी मंत्रालयात यावरून याबाबत आपण सविस्तर चर्चा करू असे स्पष्ट प्रतिपादन केले त्याचबरोबर ग्रामरोजगार सेवक मानधन डायरेक्ट बँकेत जमा करणे ग्रामरोजगार सेवकांना काही स्वरूपात पगार व लागू करणे.मातोश्री पानंद रस्त्याबाबत अडचणी विशद करण्यात आल्या अतिशय सकारात्मक खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली या ठिकाणी मनरेगा साठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला संघटनेच्या वतीने मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या सभेकरिता राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीवजी निकम,राज्य उपाध्यक्ष सुचित घरत,राज्य संपर्कप्रमुख उदयराज शेळके,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष चव्हाण देविदास,राज्य ग्रामसेवक युनियनचे ज्येष्ठ सल्लागार शिवाजीराव सोनवणे,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भीमराव दाणे पाटील,धोंड बापू लातूर जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी,लातूर सचिव श्याम म्हस्के,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बुरकुल,राज्य महिला संघटक दुर्गा भालके,जालना जिल्हा अध्यक्ष डीबी काळे पाटील,जालना जिल्हा परिषद कर्मचारी अध्यक्ष प्रवीण पवार,अहमदनगर जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे समवेत जाधवर,औरंगाबाद प्रतिनिधी रमेश मुळे,पुंडलिक पाटील आदि संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.