इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा हृदय रोग व मधुमेह विषयी मार्गदर्शन
दि. 23एप्रिल रोजी प्रा. स्वा .केंद्र नांदुरा येथे इंडियन मेडिकल असोसिएशन नांदुरा द्वारा जीवनशैली चे आजार हृदय रोग,उच्च रक्तदाब व मधुमेह विषयी आशा स्वयंसेविका व स्टाफ यांना मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ राजेंद्र गोठी,डॉ संदीप ड वंगे,डॉ एस.बी.वानखेडे व डॉ सागर अग्रवाल यांनी जीवनशैली चे आजारांवर मार्गदर्शन केले.योग्य आहार,नियमित व्यायाम, वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि व्यसनमुक्त जीवन याकडे विशेष लक्ष दिल्यास आपण या व्याधीपासून मुक्त जीवन जगू शकतो असे आव्हान केले.सदर कार्यक्राप्रसंगीआरोग्य सहाय्यक श्री खरचे,श्री इ टखेडे, सोळंके सिस्टर, शेंद्रे सिस्टर, बोद डे सिस्टर डांगे सिस्टर व नांदुरा विभागातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.