Breaking News
recent

चिमुकल्यांसाठी लसीला मंजुरी आपात्कालिन वापरास डीसीजीआयची परवानगी




    नवी दिल्ली: भारतीय औषधी नियामक नियंत्रक मंडळ (डीसीजीआय) ने मंगळवारी ५ ते १२ वयोगटातील चिमुकल्यांसाठी कोव्हॅक्सिन, कॉर्बेवॅक्स या कोविड लसींच्या आपात्कालिन मर्यादित वापरासाठी परवानगी दिली. तसेच बारा वर्षावरील मुलांना झायकोव्ह डी लसीच्या आपात्कालिन मर्यादित वापरासाठी मंजूरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची माहिती दिली. यामुळे लहानग्यांनाही लस मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

    पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या माहितीसह सुरक्षितता डेटा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताच्या कोविड विरोधातील लढाईला आता आणखी बळकटी. ६ ते १२ वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचे ५ ते १२ वयोगटासाठी कॉर्बेव्हॅक्स आणि १२ वर्षांवरील वयोगटासाठी झायकोव्ह डी चे दोन डोसला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरास मंजुरी देण्यात आली याचबरोबर डीसीजीआयने लस उत्पादकास आहे. शुक्रवारी यासंदर्भात तज्ज्ञानी ६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यासाठीची शिफारस केली होती. कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. प्रौढांना लसीकरण सध्या देशात सुरू असून त्यासाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात आला आहे. तर १५ ते १८ वयोगटातील मुलांनासुद्धा लस दिली जात आहे. गुरुवारी झालेल्या एसईसीच्या बैठकीत भारत बायोटेकच्या अर्जावर चर्चा झाली. तर शुक्रवारी कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीशिवाय आणखी डेटा तज्ज्ञांनी मागितला.

    कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेचा विचार सुरू झाला आहे. गुरुवारी एसईसीने ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल ई ची कॉर्बिव्हॅक्स लसीच्या वापराची शिफारस केली होती. सध्या कॉर्बिव्हॅक्स १२ ते १४ वयोगटातील मुलांना दिली जात आहे. भारतात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लसीकरण जानेवारीमध्ये सुरू करण्यात आले आहे. तर मार्चपासून १२ वर्षांपासून वरील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे.


Powered by Blogger.