Breaking News
recent

वडगाव गावाजवळ अपघात; एक जण ठार


    लोणार मंठा रोडवरील वडगाव सरहद गावा जवळ रात्री ११ च्या सुमारास तळणी कडून येणारे रेतीचे भारत बेंच टिप्पर व अशोक लेलँडचे टेम्पो या मध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयानक होती की दोन्ही गाड्यांचा चुरा होऊन सर्व चाके तुटून पडली. यामध्ये टेम्पो क्रमांक एम एच ३७ बी १७२४ चा चालक सचिन विष्णू खंदारे रा. कानडी तालुका मंठा हा गंभीर जखमी झाला त्याला जालना येथे उपचारासाठी नेत असतांना त्याची प्राण ज्योत मावळली. सचिन हा त्याच्या आईवडीलांना एकुलता एक मुलगा होता. याच अपघातात टिप्पर क्रमांक एम एच २१ बी यु ८८५५ चा चालक हा गंभीर जखमी झाला त्या उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस व तलाठी घटनास्थळी दाखल झाले व जखमी ला रुग्णालयात हलवले. पूर्णा नदी पात्रातून होणारी रात्रीची अवैद्य रेती वाहतूक जोमाने सुरू असल्याचे या अपघातावरून समजते. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. जर रात्रीची अवैध रेती वाहतूक सुरू नसती तर एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला नसता एवढे मात्र खरे.तळणी या ठिकाणी पोलीस चोकी असून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतात मग तरीही त्यांच्या समोर अवैध वाहतूक होत असेल तर या मागे अर्थपूर्ण दुर्लक्षच म्हणावं लागेल.

वडिलांचा आधार गेला


    कानडी येथील विष्णू खंदारे यांच्याकडे टेम्पो असून या वर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता सचिन खंदारे वय २२ वर्ष हा वडिलांना मदत व्हावी म्हणून टेम्पो चालवायचा परंतु आई वडिलांचा एकुलता एक सचिन हा या अपघाताने त्यांच्या कडून हिरावून घेतला व त्यांचा आधार गेला या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली सचिन अगदी हसतमुख व प्रेमळ स्वभावाचा असल्याने सर्व सर्वांना एक धकाच बसला


Powered by Blogger.