लोकांच्या विश्वासहर्तेमुळे सलग १५ वर्षी करोडोपती पुरस्काराने सन्मानित ! के. के. शेगोकार
खामगांव दि. २८ एप्रिल भारतीय जीवन विमा निगम सारख्या विश्वासर्ह संस्थेचा सेवक म्हणून तत्पर सेवा व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग १५ वर्षी शतकविर व करोडोपती पुरस्काराने आपला सत्कार होत आहे असा दृढ विश्वास के. के. शेगोकार विमा अभिकर्ता शेगांव यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केला.नुकताच भारतीय जीवन विमा निगम अमरावतीचे एसडीएम मलीक यांच्या हस्ते शेगोकार यांना शतकविर व करोडोपती पुरस्कार प्राप्त केल्यामुळे सन्मानित करण्यात आले.
खामगांव येथे झालेल्या ह्या सत्कार समारंभाला शाखाधीकारी श्रीरंग कुळकर्णी , विकास अधीकारी नितीन नागदिवे यांची ह्यावेळी प्रमुख उपस्थिती होती .विविध क्षेत्रातील व्यक्तींनी शेगोकार यांच्या ह्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष एस. एस.वले ,सरचिटणीस बी.के.हिवराळे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल के. एम .हेलोडे,ज्ञानदेव रणित सर यांचा समावेश आहे.